Wednesday, May 2, 2007

छत्री

छत्री

पाऊस हॊता पडत, वारा हॊता सॊसाट्याचा
चाललॊ हॊतॊ रस्त्यावरून, एक छत्री घॆऊन

हाक आली ऐकू म्हणुन पाहीले शेजारी
ठोका चुकला ह्रुदयाचा माझ्या, क्षणभर गेलो हरवून

भिजत होती एकटीच, का कोण जाणे
किती वाईट वाटले म्हणून सांगू तिला पाहून

म्हणालो छत्रीत ये, माणूस आहे तसा मी बरा
हम्म्म्म... म्हणाली ते कळतेय तुम्हाला पाहून

काय दुर्बुध्दी झाली मला, जे तिला विचारले
माझे असेच किती पावसाळे गेले निघून

एक वेळ मी भिजलोही असतो, तिला माझी छत्री देऊन
पण ती भिजत राहिली तशीच, आणी माझी छत्री गेली गंजून

- अनिरूद्ध रहाळकर.

3 comments:

Dk said...
This comment has been removed by the author.
Dk said...

Hmmm sahi ahe bhetlee ka mag ti? nantr.. chtryaa kaay re kiti pan ghesheel mag kaay? :D :D

Dr Ketki said...

I also love an Umbrella and rains. I have huge huge rainbow umbrella.. Nice to see such bloggers here, better than fake social media.