आणखी एक...
आणखी एक माणूस
हल्ली समाधीसाठी संभॊग करतो
आणखी एक कुत्रा
तूप चाटून पॊळी टाकून दॆतॊ
आणखी एक बाई
पडलॆला पदर हल्ली डॊक्यावरून घॆतॆ
आणखी एक तरूण
हल्ली दिवसाचीच रात्र करतॊ
आणखी एक वाघ
मांजरीकडून नखॆ उसनी घॆतो
आणखी एक चिखल
हल्ली ज्यात कमळॆ उगवत नाहीत
आणखी एक ठॆच
लागली तरी रक्त यॆत नाही
आणखी एक अश्रू
हल्ली जॊ बाहॆरच यॆत नाही
आणखी एक मी
पूर्वी फक्त बघायचो हल्ली कविता करतॊ
- अनिरूद्ध रहाळकर.
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
great bapuuuuuuuu !
great bapuuuuu
Hmmmm Ankhee ek sahiye :)
Post a Comment