खेळ संपला
आलो घरी
शिंकरले नाक
शॆंबूड आला बाहेर
लाल
काय केले शिमग्याला
रंग फासले तॊंडाला
खेचले लोकांचे पाय
खुन्नस काढली जुनी
चिखलात बुडवले एकेकाला
शॆंबूड आला बाहेर लाल
विचार केला कसा होतो हा तयार
अनेक दिवसांच्या सर्दीने
तो साठतो आत
जेव्हा कोंडतो श्वास
आपण शिंकरतो नाक
तो कसा झाला लाल
झाले शिमग्याचे निमित्त्त
चिकट असतो नेहेमी तेवढाच
पण नसतो रंग त्याला
होत असतो तयार आत
नेहेमीच
निमित्त्त मिळाले की येतो बाहेर
नाक सोलवटेपर्यंत
कधी भगवा कधी हिरवा
कधी निळा कधी लाल.
- अनिरुद्ध रहाळकर.
No comments:
Post a Comment